MahaTranco Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत पिंपरी चिंचवड पुणे येथे विविध पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने 03 ऑक्टोबर 2024 पर्यंत खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
◼️पदांचा तपशील : वीजतंत्री – 23 जागा
◼️शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण व राष्ट्रीय व्यवस्था प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विजतंत्री या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
◼️अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे असून अर्ज सादर करण्याची लिंक खाली नमूद केलेली आहे.
◼️अर्ज करण्याची शेवटची तारीख : इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने 03 ऑक्टोबर 2024 संध्याकाळी 11 वाजून 59 मिनिटापर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. ऑनलाईन अर्ज सादर करताना आस्थापना क्रमांक-E10202700049 हा टाकावा.
◼️कामाचे ठिकाण : कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु विभाग, महापारेषण पिंपरी चिंचवड, पुणे
◼️आवश्यक कागदपत्रे : एसएससी व आयटीआय चे चारही सत्राच्या उत्तीर्ण गुणपत्रिकाची प्रत, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, मागासवर्ग समाविष्ट असल्यास जात प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र, प्रगत व उन्नत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र, आर्थिक दृष्टिक दुर्बल घटक असल्याबाबतचे प्रमाणपत्र व इतर सर्व आवश्यक कागदपत्र च्या सत्यप्रती उमेदवाराने स्वतःचा प्रोफाईलवर स्कॅन करून अपलोड करावयात.
◼️विद्यावेतन : प्रचलित नियमानुसार निवड झालेल्या उमेदवाराला विद्यावेतन देण्यात येईल.
◼️वयोमर्यादा : दिनांक 03 ऑक्टोबर 2024 रोजी 18 वर्षापेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा जास्त नसावे.
◼️उमेदवारासाठी सूचना
- नमूद पदसंख्या कमी अधिक करण्याचे व भरती प्रक्रियाशी निगडित असलेले निर्णय घेण्याचे सर्वाधिकार व्यवस्थापन राखून ठेवत आहे व सादर निर्णय कोणत्याही प्रकारे उमेदवारास कळवले जाणार नाहीत.
- उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करताना पोर्टलवर आवश्यक मूळ प्रमाणपत्र स्कॅन करून योग्य रीतीने अपलोड करणे बंधनकारक आहे.
- विहित कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर न केल्यास त्यानंतरच्या कालावधीत आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- एसएससी गुणपत्रिकेवरील नाव, आधार कार्ड मधील नावाशी सुसंगत असणे आवश्यक आहे अन्यथा आपला अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- ऑनलाइन अर्ज सादर करताना उमेदवारांनी सद्यस्थितीत कार्यालय स्वतःचे ईमेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक देणे आवश्यक राहील.
- वर नमूद दिनांक च्या पूर्वी व नंतर ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांचा भरती व निवड प्रक्रिया करिता विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
- तुम्ही सुद्धा या पद्धतीसाठी इच्छुक असेल तसेच पात्र असेल तर खाली दिलेल्या लिंक वरून जाहिरात डाऊनलोड करून लगेच अर्ज सादर करावा.
Mahapareshan PCMC Bharti 2024 | MahaTransco Recruitment 2024
मूळ जाहिरात : डाउनलोड करा
ऑनलाइन अर्ज : येथे क्लिक करा
👇👇या महिन्यातील लेटेस्ट जॉब्स👇👇
👉मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी मेगा भरती; पगार 35000 रुपये | MBMC Recruitment 2024