बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1846 जागांसाठी मेगा भरती;सुधारित जाहिरात आली,हि आहे शेवटची तारीख | BMC Clerk Bharti 2024

BMC Clerk Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत (BMC Jobs vacancies) ‘कार्यकारी सहायक’ (लिपिक) या संवर्गातील 1846 जागा सरळ सेवेने भरण्यासाठी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या जागांसाठी इच्छुक तसेच उमेदवारांकडून दिनांक 21 सप्टेंबर 2024 पासून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा       

👉पदांचा तपशील : कार्यकारी सहायक (पूर्वीचे नाव – लिपिक) – 1846 जागा

👉शैक्षणिक पात्रता : उमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा आणि उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण असावा. (अधिक माहितीसाठी जाहिरात डाउनलोड करून वाचावी व नंतर अर्ज सादर करावा)

👉अर्ज कसा करावा : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरील खाली दिलेल्या लिंकवर या पदासाठीची संपूर्ण जाहिरात, अटी व शर्तींसह प्रसिद्ध करण्यात येत आहे. या जाहिरातीमध्ये ऑनलाईन अर्जाची लिंक (यूआरएल) देण्यात आली असून त्यावर क्लिक केल्यानंतर इच्छुक उमेदवारांना अर्ज भरता येईल.

👉कालावधी : दिनांक 21 सप्टेंबर 2024 पासून दिनांक 11 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 11:59 मिनिटे वाजेपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करता येईल.

👉सूचना : उमेदवारांनी जाहिरातीसोबत दिलेल्या सर्व मार्गदर्शक सुचनांचे काळजीपूर्वक वाचन करावे. तसेच त्यांचे काटेकोरपणे पालन करुन विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज दिलेल्या मुदतीत सादर करावा. तसेच भरलेल्या संपूर्ण अर्जाची प्रिंट काढून स्वत:जवळ ठेवावी, असे आवाहन महानगरपालिकाच्या वतीने सूचित करण्यात आले आहे.

👉शेवटची तारीख :  दिनांक 11 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 11.59 मिनिटे ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि वेळ आहे, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरील https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlrn या लिंकवर या भरतीबाबत सविस्तर जाहिरात देण्यात आली आहे.

👉मदतसेवा :  उमेदवारांच्या मार्गदर्शनासाठी 9513253233 हा मदतसेवा क्रमांकही जारी करण्यात येत आहे. सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान (दुपारी 1.30 ते 2.30 वाजेदरम्यानचा भोजन कालावधी वगळता) या क्रमांकावर उमेदवारांना संपर्क साधता येईल, असेही महानगरपालिका प्रशासनाच्या (Brihanmumbai Municipal Corporation) वतीने कळविण्यात येत आहे.

👉पगार : बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विविध खात्यांच्या आस्थापनेवरील गट ‘क’ मधील रु. 25500-81100 (मॅट्रिक्स-एम 15) अधिक अनुज्ञेय भत्ते या सुधारित वेतनश्रेणीतील ‘कार्यकारी सहायक’ (लिपिक) या संवर्गातील 1 हजार 846 रिक्त भरण्यात येणार आहेत.

👉संवर्गानुसार रिक्त जागांचा तपशील : (Category wise Vacancies) अनुसूचित जाती (१४२ जागा), अनुसूचित जमाती (१५० जागा), विमुक्त जाती-अ (४९ जागा), भटक्या जमाती-ब (५४ जागा), भटक्या जमाती-क (३९ जागा), भटक्या जमाती-ड (३८ जागा), विशेष मागास प्रवर्ग (४६ जागा), इतर मागासवर्ग (४५२ जागा), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (१८५ जागा), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (१८५ जागा), खुला प्रवर्ग (५०६ जागा ) याप्रमाणे रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाईल. तसेच या पदांचे समांतर आरक्षणानुसार वर्गीकरण करण्यात आले असून त्याची सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे.

मूळ जाहिरात : डाउनलोड करा

ऑनलाईन अर्जाची लिंक : येथे क्लिक करा

हे हि वाचा…

👉रयत शिक्षण संष्ठेमध्ये “लिपिक” पदांसाठी मोठी भरती; पगार 34920 रुपये | Rayat Shikshan Sanstha Bharti

👉समाज कल्याण विभागामध्ये विविध पदांसाठी मोठी भरती; कोणतीही परीक्षा नाही | Samaj Kalyan Vibhag Bharti

👉बृहन्मुंबई महानगरपालिकेत “निरीक्षक” पदांसाठी पदवीधारकांना 178 रिक्त जागांवर नोकरीची संधी;पगार 92300 रुपये | BMC Recruitment 2024

👉सहकारी पतसंस्थेमध्ये शिपाई,लिपिक व वाचमन पदांसाठी मोठी भरती;परीक्षा नाही | Sahakari Patsanstha Bharti 2024

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा