मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी मेगा भरती; पगार 35000 रुपये | MBMC Recruitment 2024

MBMC Recruitment 2024 : मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये (Mira Bhaindar Municipal Corporation) विविध पदे भरण्यासाठी पदाभरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा       

इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी खालील लिंक वरून जाहिरात व अर्जाचा नमुना डाऊनलोड करून 24 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी दहा वाजता मुलाखतीला हजर राहावे.

◼️पदांचे नाव : शिक्षक (माध्यमिक) – 17 जागा

◼️शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी धारण केलेली असावी सोबतच अर्जदार हा बीएड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, संबंधित विषयांमध्ये बीएड असलेल्या उमेदवारासच मुलाखत देता येणार आहे.

◼️निवड प्रक्रिया : उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे होणार असून शैक्षणिक पात्रतेस 100 पैकी 70 गुण, विषयाच्या ज्ञानाला 100 पैकी 20 गुण तर अनुभवासाठी 10 गुण ठेवण्यात आलेले आहेत. यामध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या उमेदवाराची निवड येथे केल्या जाईल.

◼️वयोमर्यादा : शिक्षक माध्यमिक पदासाठी वयोमर्यादा किमान 18 वर्षे असून जास्तीत जास्त आणि 38 वर्ष राहणार आहे, अर्जदार मागासवर्गीय असल्यास वयोमर्यादा 43 वर्ष राहील, अर्जदाराचे वय जाहिरात प्रसिद्धीच्या दिवशी करण्यात येईल.

◼️अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे : शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला, डोमिसाईल प्रमाणपत्र, पदवी उत्तीर्ण गुणपत्रिका व बीएड उत्तीर्ण गुणपत्रिका, शिक्षक पात्रता परीक्षा TET -CET उत्तीर्ण प्रमाणपत्र, अनुभवाचे प्रमाणपत्र असल्यास सोबत जोडावे.

◼️अर्ज करण्याची पद्धत : जाहिरातीमधील विहित नमुन्यात उमेदवाराने अर्ज सादर करायचा आहे खालील लिंक वरून जाहिरात व अर्जाचा नमुना डाऊनलोड करू शकता.

◼️पगार : निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 35000 रुपये एवढे मानधन देण्यात येणार आहे.

◼️मुलाखतीची तारीख : 24 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागेल.

◼️मुलाखतीचा पत्ता : स्थायी समिती सभागृह, मीरा-भाईंदर महानगरपालिका मुख्य कार्यालय, दुसरा मजला, स्वर्गीय इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प).

◼️उमेदवारासाठी सूचना

  1. निवड झालेल्या उमेदवारांची निवड यादी व प्रतीक्षा यादी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
  2. शिक्षक पदासाठी मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  3. मुलाखतीसाठी येण्या जाण्याचा कोणताही खर्च दिला जाणार नाही.
  4. फक्त याच जाहिरातीला अनुसरून प्राप्त झालेल्या उमेदवारांचे अर्ज विचारात घेतले जातील महानगरपालिकेकडे यापूर्वी केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही तसेच इतर राज्यातून महाराष्ट्र राज्य स्थलांतरित झालेल्या मागासवर्गीय उमेदवारांच्या अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  5. निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर किंवा नियुक्तीनंतर कोणत्या क्षणी उमेदवाराने दिलेले माहिती अथवा कागदपत्र खोटी सादर केल्याचे किंवा खरी माहिती दडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास तर उमेदवारांची निवड तात्काळ रद्द करण्यात येईल.
  6. निवड झालेल्या उमेदवाराविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये फौजदारी गुन्हा नोंदवला असेल तर त्याला त्याचे स्पष्टीकरण देणे अनिवार्य राहील स्पष्टीकरण समाधानकारक नसल्यास उमेदवाराची निवड रद्द करण्यात येईल.
  7. करार पद्धतीने नियुक्ती देण्यात आल्यामुळे संबंधित शासनाच्या कोणत्याही संवर्गात महानगरपालिकेमध्ये सेवा समावेश याबाबत सामावून घेण्याबाबतचा अधिकार किंवा हक्क नसेल.
  8. सदर भरती प्रक्रियेतील निवड झालेल्या उमेदवारांचे कागदपत्रा व्यतिरिक्त उर्वरित सर्व कागदपत्रे फक्त एका महिन्यापर्यंत महानगरपालिकेकडे उपलब्ध राहतील.
  9. तुम्ही सुद्धा या पदावरती साठी इच्छुक असाल तसेच पात्र असाल तर खालील लिंक करून जाहिरात अर्जाचा नमुना डाऊनलोड करून दिलेल्या तारखेस मुलाखतीस उपस्थित राहावे.

मूळ जाहिरात व अर्जाचा नमुना : डाऊनलोड करा

👇या महिन्यातील नवीन जॉब्स👇

👉भारतीय रेल्वेमध्ये तिकीट क्लर्क, लिपिक, स्टेशन मास्टर पदांसाठी 11558 रिक्त जागांवर भरती | RRB Recruitment 2024

👉नामांकित सहकारी बँकेत शिपाई,लिपिक व इतर पदांसाठी मोठी भरती;लगेचच अर्ज करा | Sahakari Bank Recruitment 2024

👉इंडिया पोस्ट GDS निकाल 2024 – दुसरी मेरिट लिस्ट जाहीर, निकाल PDF डाउनलोड करा | India Post GDS Result 2024

👉बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी मेगा भरती;लगेचच करा अर्ज | BMC Bharti 2024

👉जिल्हा परिषद बीड अंतर्गत प्रयोगशाळा तंत्रज्ञ व औषध निर्माता पदांसाठी मोठी भरती;त्वरित अर्ज करा | ZP Beed Recruitment

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा