ZP Pune Bharti 2024 : जिल्हा परिषद पुणे अंतर्गत येणाऱ्या विविध रुग्णालयामध्ये विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून 2 सप्टेंबर 2024 पर्यंत विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
उमेदवाराने अर्ज करण्या अगोदर संपूर्ण जाहिरात वाचावी व विहित नमुनेतील अर्ज डाऊनलोड करून व्यवस्थित रित्या भरून नमूद केलेल्या पत्त्यावर सादर करावा.
पदांचा तपशील
1.वैद्यकीय अधिकारी : 02 जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस उत्तीर्ण तसेच महाराष्ट्र स्टेट मेडिकल कौन्सिलची नोंदणी आवश्यक, एच आय व्ही एस प्रोग्राम मध्ये काम केलेले असल्यास अशा उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल.
वेतन : 72 हजार रुपये दरमहा
2.कौन्सिलर – 01 जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठामधून सोशल वर्क,सायकॉलॉजी, ह्युमन डेव्हलपमेंट मध्ये पदवीधारण केलेली असावी तसेच एम एस सी आय टी, सी सी सी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
पगार : 21000
3.लॅब टेक्निशियन : 13 जागा
शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा बीएससी, बीएएमएलटी किंवा बी एम एल असावा किंवा डीएमएलटी मध्ये पदवीका धारण केलेली असावी व दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
पगार : 21000 हजार रुपये
निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे उमेदवाराची निवड होणार असून 05 सप्टेंबर 2024 रोजी उमेदवाराला मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे, प्राप्त झालेल्या अर्जाची पडताळणी करून उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.
आवश्यक कागदपत्रे : मुलाखतीला जाते वेळेस उमेदवाराने मूळ शैक्षणिक कागदपत्र तसेच एक साक्षंकित प्रत सोबत ठेवावी यामध्ये एमबीबीएस ची पदवी, पदव्युत्तर पदवी, नोंदणी प्रमाणपत्र व इंटर्नशिप पूर्ण केल्याबाबतचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
मुलाखतीचे ठिकाण : ही मुलाखत सिविल सर्जन ऑफिस डिस्ट्रिक हॉस्पिटल औंध पुणे येथे घेतले जाणार आहे.
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय जास्त 60 असावे.
अर्ज करण्याची पद्धत : इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी खालील लिंक वर अर्जाचा नमुना डाऊनलोड करावा व खालील नमूद केलेल्या पत्ता पाठवावा.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, पुणे डिस्ट्रिक्ट एड्स प्रेवेन्शन अँड कंट्रोल युनिट, चेस्ट हॉस्पिटल बिल्डिंग, ग्राउंड फ्लोअर, नियर एआरटी सेंटर, औंध पुणे-27 या ठिकाणी पाठवायचे आहेत.
उमेदवारासाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवाराने अर्ज करण्या अगोदर संपूर्ण जाहिरात वाचावी व त्यानंतर अर्ज सादर करावा.
- मुलाखतीसाठी उमेदवाराला कोणत्याही प्रकारचे भत्ता देण्यात येणार नाही परीक्षेसाठी अथवा मुलाखतीसाठी साठी उमेदवारांनी स्वखर्चाने हजर राहायचे आहे.
- पदसंख्येमध्ये बदल करण्याचा अधिकार विभागाने राखून ठेवलेला आहे.
मूळ जाहिरात व अर्जाचा नमुना : डाउनलोड करा
अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
हे हि वाचा…
ICMR-NITVAR पुणे येथे मध्ये क्लर्क पदांवर पदासाठी बंपर भरती; इथे पहा सविस्तर माहिती