New ZP Bharti 2024 : जिल्हा परिषद नंदुरबार येथे संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यासाठी विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात अली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून जाहिरातीतील विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत.
◼️पदाचे नाव : विविध 24 पदांसाठी एकूण 138 रिक्त जागांवर भरती राबविण्यात येत आहे.
◼️शैक्षणिक अर्हता : मानतयताप्राप्त संस्थेतून कमीत कमी बारावी पास पासून पदव्युत्तर उमेदवार अर्ज करू शकतील.
◼️अर्ज करण्याची शेवटची तारीख : इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने आपले अर्ज पोस्टाने अथवा कुरियरने 10 सप्टेंबर 2024 पर्यंत सादर करावेत, समक्ष जाऊन सुद्धा अर्ज सादर करू शकणार आहेत.
◼️मुलाखतीचा कालावधी : अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्याची पडताळणी करून उमेदवारास 12 सप्टेंबर 2024 रोजी थेट मुलाखत घेतली जाणार आहे.
◼️वयोमर्यादा : सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय मुंबई यांचे दिनांक 25 एप्रिल 2016 चे शासन निर्णयास अनुसनरुन अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकास उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे व कमाल वय खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे व मागासवर्गीय करीता 43 वर्षे राहील.
वैद्यकीय अधिकारी (एम.बी.बी.एस) व विशेषज्ञ अतिविशेषज्ञ यांची सेवाप्रवेश आणि सेवा समाप्तीची वयोमर्यादा 70 वर्ष राहील व अभियानातील इतर रुग्ण सेवेशी संबंधित पदांची (उदा. परिचारिका, अधिपरिचारिका, तत्रज्ञ, समुपदेशक, औषधनिर्माता इ.) यांची सेवाप्रवेश व सेवासमाप्तीची वयोमर्यादा 65 वर्ष राहील.
राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या सेवेतील कार्यरत उमेदारांकरिता कमाल सेवा प्रवेश मर्यादा प्रमाणित शारिरीक योग्यता (Physical Fitness) चे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. वय वर्ष 60 नंतर प्रत्येक वर्षी जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडुन शारीरीकदृष्टा सक्षम असल्याचे प्रमाणपत्र पाप्त झालेनंतरच पर्ननियक्ती आदेश देण्यात येईल.
◼️शुल्क : खुल्या उमेदवारांनी रु 150/- व राखीव प्रवर्गासाठी रु. 100/- इतके चा अर्ज शुल्क राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राष्ट” District Integrated Health & Family Welfare Society, Nandurbar” या नावाने देय असलेला असावा. बँकेचा डिमांड ड्राफ्ट सादर न केल्यास आपला अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
◼️अर्ज पाठविण्याचा/मुलाखतीचा पत्ता :
1) जाहिरातीतील विशेषतज्ञ संवर्गातील अनु. क्रमांक 1 ते 10 पदांची थेट मुलाखत दिनांक 12/09/2024 रोजी सकाळी/दुपारी 10:00 वा. जिल्हा रुग्णालय, नंदुरबार येथे आयोजित करण्यात आलेली आहे. थेट मुलाखती करिता उमेदवारांनी सर्व शैक्षणिक व अनुभवाचा मुळ दस्ताऐवज व छांयाकित प्रतीसह उपस्थित राहावे.
2) जाहिरातीतील अ.क्र 11 ते 24 पदे महिला व बाल रुग्णालय, नंदुरबार, जिल्हा रुग्णालय परीसर ता.जि. नंदुरबार या पत्त्यावर पोष्टाद्वारे / अथवा प्रत्यक्षात (By Hand) दि. 10/09/2024 रोजी सायं 5:00 वा. या कालावधीतपर्यंत सादर करावेत.
3) इच्छुक उमेदवारांनी 1) विहीत नमुन्यातील अर्ज 2) वयाचा पुरावा 3) पदवी/पदविका प्रमाणपत्र (सर्व वर्षाचेप्रमाणपत्र) 4) सर्व गुणपत्रिका (5) कौन्सील रजिस्ट्रेशनचे वैध प्रमाणपत्र (As Applicable) 6) शासकीय कामाचे अनुभव प्रमाणपत्र कागदपत्रे कार्यालय प्रमुखाच्या स्वाक्षरी तथा नाव व मोबईल क्र. सह (अनुभव संबंधित कामाचा असावा) शासकीय अनुभव असल्यास सोबत नियुक्ती आदेशाची प्रत जोडावी 7) जात प्रमाणपत्र इ. छायांकित प्रर्तीसह दि.10/09/2024 रोजी सायं 5:00 वा.या कालावधीतपर्यंत सादर करावेत.
4) विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस.या रिक्त पदाची प्रत्येक आठडयास दर मंगळवार रोजी थेट मुलाखत घेण्यात येईल.
5) अधिपरीचारीका (स्टाफ नर्स) पदाकरीता स्त्री प्रर्वगातील उमेदवारांनी अर्ज सादर करावा. पुरुष प्रर्वगातील उमेदवारांचा अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाही यांची नोंद घ्यावी.
6) कागदपत्रे अपूर्ण असल्यास अर्ज नामंजुर करण्यात येईल व कागदपत्रे पुनः प्रस्तुत करण्याची संधी देण्यात येणार नाही.
7) पदासमोर नमुद मानधन हे एकत्रित मानधन असुन त्याव्यतिरिक्त इतरकोणतेही भत्ते देय राहणार नाही.
ZP Nandurbar Bharti 2024 | ZP Nandurbar Recruitment 2024 | Zilla Parishad Bharti 2024
मूळ जाहिरात : डाउनलोड करा
हे हि वाचा…
युनियन बँकेमध्ये तब्बल 500 जागांसाठी मेगा भरती; ऑनलाईन लगेच अर्ज करा | Union Bank Bharti 2024
भारतीय रेल्वेमध्ये तिकीट क्लर्क, लिपिक, स्टेशन मास्टर पदांसाठी 11558 रिक्त जागांवर भरती