Sahakari Patsanstha Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य विज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित अंतर्गत लिपिक, शिपाई व वॉचमन पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
यासाठी उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे होणार आहे इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी खालील दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीला हजर राहावे.
10वी, 12वी व पदवीधर उमेदवारास नोकरीची चांगली संधी चालून आली असून इच्छुक उमेदवाराने खाली नमूद केलेल्या पत्त्यावर विहित तारखेस मुलाखतीला हजर राहावे.
◼️पदांचा तपशील
- लिपिक – 01 जागा
- शिपाई – 01 जागा
- वॉचमन – 01 जागा
◼️शैक्षणिक पात्रता
- लिपिक – मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेचा पदवीधर असावा तसेच संगणक ज्ञान असणे सुद्धा आवश्यक आहे, सहकारी संस्थेत काम केल्याचा अनुभव असल्यास प्राधान्य दिल्या जाईल.
- शिपाई – मान्यताप्राप्त शाळेतून किमान इयत्ता दहावी पास असणे आवश्यक व सहकारी संस्थेत काम केल्याचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.
- वॉचमन – मान्यताप्राप्त शाळेतून किमान इयत्ता दहावी पास असणे आवश्यक व सहकारी संस्थेत काम केल्याचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.
◼️मुलाखतीची तारीख : इच्छुक पात्र उमेदवाराची मुलाखत 22 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी साडेदहा वाजता घेतल्या जाईल.
◼️मुलाखतीचा पत्ता : महाराष्ट्र राज्य विद्युत तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित, शेवगाव, मुख्य कार्यालय, तांत्रिक भवन, प्लॉट नंबर 51, आशीर्वाद कॉलनी, सारसनगर, अहमदनगर
◼️उमेदवारासाठी सूचना
- इच्छुक पात्र उमेदवाराने रविवारी 22 सप्टेंबर 2024 मुलाखतीस आवश्यक कागदपत्र सह हजर राहावे.
- उमेदवाराला मुलाखतीसाठी स्वखर्चाने संस्थेच्या वर नमूद केलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.
- उमेदवाराला मुलाखतीला येताना मूळ कागदपत्रांच्या छायांकित प्रति व मूळ कागदपत्रे सोबत ठेवणे बंधनकारक राहील.
- भरती पदाची संख्या कमी अथवा ज्यादा किंवा भारतीय रद्द करण्याचा अधिकार संचालक मंडळास राहिल याची नोंद घ्यावी.
- तुम्ही सुद्धा इच्छुक असाल तसेच पात्र असेल तर खालील लिंक वरून मूळ जाहिरात डाऊनलोड करा व्यवस्थित रित्या वाचा आणि आवश्यक कागद्पत्रसासह मुलाखतीला हजार रहा.
मूळ जाहिरात : डाऊनलोड करा
👇या महिन्यातील नवीन जॉब्स👇
👉बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी मेगा भरती;लगेचच करा अर्ज | BMC Bharti 2024