जिल्हा परिषदेकडून कडबा कुटी यंत्र,मोटार पंप,फवारणी यंत्र,डिझेल इंजिन व ताडपत्री वाटप | Zilla Parishad Yojana

Zilla Parishad Yojana 2024 : जिल्हा परिषदेअंतर्गत सर्वसामान्य नागरिकांसाठी व शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत अर्ज सुद्धा मागविले जातात व त्याची जाहिरात सुद्धा केली जाते.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा       

विविध ठिकाणी या योजनेविषयीची माहिती नसते तसेच गावातील नागरिकांना याविषयी खूपच कमी माहिती असते त्यावेळेस गावातील मोठे किंवा शिक्षित उमेदवार या योजनेचा लाभ घेतात व बाकीचे नागरिक लाभ घेऊ शकत नाहीत.

आमच्या संकेतस्थळावर अशा विविध योजना विषयीची माहिती दिली जाते जे सर्व सामान्य पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची सर्वांची आहे हीच माहिती तुम्हाला मोफत मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा, तसेच व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा.

जिल्हा परिषद सातारा कृषी विभाग अंतर्गत जिल्हा परिषद स्वनिधीतील वैयक्तिक लाभाच्या योजना अंतर्गत 2024-25 साठी अर्ज मागविण्यात येत आहेत हे अर्ज त्या त्या पंचायत समितीकडे सादर करणे आवश्यक आहे, अर्जाचा नमुना खाली दिलेला असून योजना विषयीची माहिती सुद्धा खाली दिलेल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये आहे.

योजनांचा तपशील

  1. दोन एचपी विद्युत चलीत
  2. कडबा कुट्टी यंत्र
  3. कॅनव्हास एचडीपी ताडपत्री
  4. ट्रिपल पिस्टन स्पेअर्स
  5. इंजन मोटर्स
  6. बॅटरी ऑपरेटर सायकल कोळपे
  7. पाच किंवा साडेसात एचपी विद्युत संच
  8. 3 एचपी विद्युत पंप संच
  9. चार किंवा पाच एचपी डिझेल इंजिन
  10. एचडीपी किंवा पीव्हीसी पाईप
  11. ट्रॅक्टर चलित रोटावेटर
  12. कृषी यांत्रिकीकरण पलटी नांगर, पाचट कुटी यंत्र, खोडवा तपासणी यंत्र पेरणी यंत्र इत्यादी.
  13. पावर विडर मध्ये भेटण्यासाठी अनुदान

वर नमूद केलेल्या विविध 13 प्रकार च्या योजनेसाठी जिल्हा परिषद सातारा अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत यासाठी अनुदानाची मर्यादा 50% पासून 100%पर्यंत असणार आहे.

विविध प्रकारच्या अनुदानाची माहिती खालील प्रसिद्धी पत्रकामध्ये आहे, उमेदवाराने प्रसिद्धीपत्रक व्यवस्थित रित्या वाचावे व त्यानंतर अर्ज सादर करावा.

आवश्यक कागदपत्रे

  • शेतीचा 8अ उतारा
  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • छोटे कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र
  • रेशन कार्ड
  • पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा पशुधन उपलब्धतेचे प्रमाणपत्र
  • सिंचन सुविधा पुरावा
  • ट्रॅक्टरचे आरसीटीसी बुक इत्यादी

महत्वाच्या सूचना

  1. अर्जदार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्याचा अर्ज सोबत समक्ष प्राधिकार्‍यांची जात प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक राहील.
  2. अर्जदार अपंग प्रवर्गातील असल्यास सक्षम प्राधिकार्‍यांच्या कडील अपंगत्वाचे प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक राहील.
  3. अर्जदार महिला असल्यास महिलेच्या नावे शेतीचा 8अ उतारा आवश्यक राहील.
  4. प्रवर्गनिहाय राखीव लाभाचे प्रमाण अनुसूचित जाती 15 टक्के, अनुसूचित जमाती ७.5 टक्के, अपंग 5 टक्के महिला 30 टक्के व उर्वरित इतर नागरिकांसाठी असतील.

अर्ज करण्याची पद्धत

इच्छुक नागरिकांनी प्रसिद्धी पत्रकांमधील अर्जाचा नमुना डाऊनलोड करून प्रिंट करावा व व्यवस्थित रित्या भरून पंचायत समितीतील गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर करावा.

आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्राची सूची तपासून त्यानंतर अर्ज जमा करावा आपल्याला कोणत्या योजनेमध्ये अर्ज करायचा आहे या योजनेविषयीची माहिती सुद्धा प्रसिद्धपत्रकामधे दिलेली आहे प्रसिद्धीपत्र व्यवस्थितरित्या डाऊनलोड करून माहिती वाचून त्यानंतर अर्ज सादर करावा.

अर्जाचा नमुना व प्रसिद्धिपत्रक : डाऊनलोड करा
इतर महत्त्वाच्या योजना

10वी पासवर नगररचना आणि मूल्य निर्धारण 261 जागांवर भरती;थोडेच दिवस बाकी | DTP Maharashtra Bharti

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा