MSSC Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अंतर्गत राज्यातील विविध ठिकाणी आणि मुंबई महानगर प्रदेश अंतर्गत येणाऱ्या विविध शासकीय व इतर औद्योगिक व्यवसायिका आस्थापना साठी विविध पदे भरायची आहेत.
यासाठी इच्छुक तसेच पात्रता धारक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत सविस्तर जाहिरात वाचून उमेदवार पात्र असेल तर त्यांनी अर्ज सादर करावा.
◼️पदाचा तपशील : सुरक्षा पर्यवेक्षक अधिकारी – 19 जागा
◼️आवश्यक पात्रता : नमूद पदासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून किंवा राज्य राखीव पोलीस बलातून पोलीस निरीक्षक सहायक पोलीस निरीक्षक या पदावर सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी, शैक्षणिक पात्रता मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण.
◼️वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला कमीत कमी 35000 ते जास्तीत जास्त 45000 एवढे मासिक वेतन दिले जाणार आहे.
◼️अर्ज सादर करण्याची पद्धत : इच्छुक व पात्र उमेदवार यांनी जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करायचे आहेत अर्ज पोस्टाने किंवा प्रत्यक्ष सादर करणे आवश्यक असेल.
◼️अर्ज पाठवण्याचा पत्ता : पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई, सेंटर-1 ,32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई -400 005
◼️अर्ज सादर करण्याचा कालावधी : इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने 26 सप्टेंबर 2024 ते 11 ऑक्टोबर 2024 संध्याकाळी 06 वाजेपर्यंत अर्ज सादर करायचे आहेत.
◼️निवड प्रक्रिया : प्राप्त झालेल्या अर्जाची पडताळणी करून पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.
◼️मुलाखतीचे ठिकाण : पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई, सेंटर एक, 32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई 400 005
◼️मुलाखती वेळी सादर करायचे कागदपत्रे : वैयक्तिक माहिती, शैक्षणिक कागदपत्रे, सेवानिवृत्त प्रमाणपत्र, निवृत्तीवेतन पुस्तिकेचे प्रत, फोटो, पॅन कार्ड, आधार कार्ड, मागील पाच वर्षाचे एसीआर.
◼️उमेदवारासाठी महत्त्वाच्या सूचना
👉उमेदवारांच्या प्राप्त अर्जानुसार मुलाखतीसाठी बोलवण्यात येणाऱ्या उमेदवारांची यादी तयार करण्यात येईल किमान अर्हता प्राप्त उमेदवारांना मुलाखतीची वेळ दिनांक याबाबत भ्रमणध्वनी द्वारे कळवण्यात येईल.
👉मुलाखतीसाठी उमेदवारांना स्वखर्चाने हजर राहावे लागेल.
👉मुलाखत अनुभव इत्यादीवर आधारित उमेदवारांची नामिका सुचित तयार करण्यात येईल आणि महामंडळात उपलब्ध जागेनुसार या सूची मधील गुणानुक्रम विचारात घेऊन नियुक्ती दिली जाईल.
👉सदर निवड प्रक्रिया कोणत्याही वेळी, कोणत्याही कारणास्तव, कोणत्याही टप्प्यावर पूर्णता किंवा अंशतः रद्द करण्याचा फेरबदल करण्याचा अधिकार महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई यांच्याकडे राखून ठेवलेला आहे.
मूळ जाहिरात व अर्जाचा नमुना : डाऊनलोड करा