Mahavitaran Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी 2024-25 या कालावधी करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
जाहिराती मध्ये नमूद केल्यानुसार ऑनलाईन अर्ज सादर करावेत, या पदभरती मध्ये विविध पदाचा समावेश असून यामध्ये विजतंत्री, तारतंत्री, कोपा अश्या एकूण 85 रिक्त जागा चा समावेश असणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे दहावी + आयटीआय उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांना येथे अर्ज सादर करायचे आहेत, ही भरती शिकाऊ उमेदवार यांच्यासाठी असेल.
या भरतीसाठी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल व त्यानुसार निवड करण्यात येणार आहे दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून विजतंत्री, तारतंत्री व कोप या व्यवसायात उमेदवार उत्तीर्ण असणे आवश्यक राहणार आहे.
2024 रोजी कमीत कमी 18 वर्षे पूर्ण असावे व जास्तीत जास्त तीस वर्षापर्यंत असणे आवश्यक असेल राखीव गटामधून तुम्ही जर अर्ज करत असाल तर उमेदवाराला वयाची अट पाच वर्ष शिथिलक्षम ठेवण्यात येणार आहे.
बेरोजगार उमेदवारांना चांगली संधी महावितरण अंतर्गत आलेली आहे त्याकरता उमेदवाराने आवश्यक त्या कागदपत्रासह अर्ज सादर करावेत, उमेदवार जर राखीव गटातून अर्ज करत असल्यास त्यांना जातीचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.
गोंदिया तालुका, तिरोडा तालुका व गोरेगाव तालुक्यातील पात्र उमेदवार आणि अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे ते अर्ज 1 ऑक्टोबर 2024 ते 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत सादर करावे लागतील.
या मुदतीनंतर आलेले कोणत्याहि प्रकारचे अर्ज येथे स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवाराने नोंद घ्यावी संवसू विभाग महावितरण जुने पावर हाऊस, रामनगर, गोंदिया या अंतर्गत घेण्यात येत आहे.
गुणवत्ता यादीनुसार निवड होणार असून आलेल्या अर्जाची पडताळणी करून अधिक गुण असलेल्या उमेदवाराची निवड या ठिकाणी केली जाणार आहे.
जर या भरती साठी तुम्ही इच्छुक तसेच पात्र असाल तर आत्ताच खाली लिंक वरून जाहिरात डाऊनलोड करा व https://www.apprenticeshipindia.gov.in/ ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करा.