जिल्हा मध्यवर्ती बँकेत लिपिक व शिपाई पदांसाठी 358 रिक्त जागांवर भरती; त्वरित अर्ज करा | CDCC Bank Bharti

CDCC Bank Bharti : बँकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (Chandrapur DCC Bank Bharti 2024) विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा       

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह 19 ऑक्टोबर 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

हे हि वाचा : AIASL मध्ये 10 वी पासवर मोठी भरती; थेट भरती होणार परीक्षा नाही | AIASL Recruitment 2024

👉पदसंख्या : 358 रिक्त जागा

👉पदांचा तपशील : शिपाई – 97 जागा, लिपिक – 261 जागा

👉शैक्षणिक पात्रता : या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे तसेच उमेदवाराला इंग्रजी भाषेचे व संगणकाचे ज्ञान असणे गरजेचे आहे.

👉वयोमर्यादा : या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 ते 38 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.

👉अर्जाचे शुल्क /परीक्षा शुल्क : याभरती मध्ये अर्ज शुल्क म्हणून 560.50 रुपये आकारण्यात आलेले आहे.

👉पगार : या भरती प्रक्रियेमध्ये अर्जदाराला पदानुसार पगार देण्यात येणार आहे (सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी).

👉निवड पद्धती : उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखती द्वारे होणार आहे.

👉नोकरीचे ठिकाण : चंद्र्पुर

👉अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

हे हि वाचा : पाटबंधारे विभागात विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध; सरकारी नोकरीची चांगली संधी | Patbandhare Vibhag Bharti 2024

👉अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 ऑक्टोबर 2024

👉उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  1. उमेदवारांनी अर्ज सविस्तर वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास सादर करावेत.
  2. उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  3. अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
  4. उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.

मूळ जाहिरात : डाउनलोड करा

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा