BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नगर अभियंता मध्यवर्ती कार्यालयामध्ये विविध 690 रिक्त जागांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
वेगवेगळ्या चार पदासाठी ही भरती असून एकूण 690 रिक्त जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत, संवर्ग निहाय जागांसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात डाउनलोड करून वाचावी.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी;पगार 67250 रुपये | MCGM BMC Recruitment 2024
पदांचा तपशील
- कनिष्ठ अभियंता स्थापत्य – 250 जागा
- कनिष्ठ अभियंता यांत्रिकी व विद्युत – 130 जागा
- दुय्यम अभियंता स्थापत्य – 233 जागा
- दुय्यम अभियंता यांत्रिकी व विद्युत्य – 77 जागा
शैक्षणिक पात्रता : अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी पदवी धारण केलेली असावी, संबंधित विषयांमध्ये अभियांत्रिकी पदवी धारण केलेली असल्यास उमेदवाराला अर्ज सादर करता येणार आहे.
पगार : या ठिकाणी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला कमीत कमी 41800 ते जास्तीत जास्त 142400 रुपये व इतर अनुज्ञेय भत्ते एवढा पगार दिला जाणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे असून अर्ज सादर करण्याची लिंक खाली दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही 11 नोव्हेंबर 2024 ते 12 डिसेंबर 2024 या दरम्यान अर्ज सादर करू शकणार आहात.
उमेदवारासाठी सूचना
- वर नमूद केलेल्या पदासाठीची विस्तृत जाहिरात व माहिती खालील दिलेल्या जाहिरातीमध्ये नमूद केलेली आहे.
- अर्ज करण्या अगोदर उमेदवाराने संपूर्ण जाहिरात व्यवस्थितरित्या वाचावी व पात्रता धारण करीत असल्यास अर्ज सादर करावा.
- उमेदवाराने अर्ज 11 नोव्हेंबर 2024 पासून महानगरपालिकेचे संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात होणार आहेत या कालावधी दरम्यान उमेदवाराने अर्ज सादर करायचे आहेत या कालावधीनंतर ऑनलाईन अर्ज ची लिंक बंद करण्यात येईल.
- ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर उमेदवाराने अर्जाचे प्रिंट काढून स्वतः जवळ ठेवावी उमेदवाराच्या मार्गदर्शनासाठी मदत कक्षाचा संपर्क तपशील महानगरपालिकेचे संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- संकेतस्थळावरील जाहिरातीला अनुसरून सदर पदासाठीची विविध अर्हतेची पूर्तता करणाऱ्या पात्र इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करावेत.
- जाहिराती सोबत मार्गदर्शन सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनाच काटेकोरपणे उमेदवाराने पालन करणे आवश्यक आहे.
- तुम्ही सुद्धा या पद्धतीसाठी इच्छुक असेल तसेच पात्र असेल तर खालील लिंक करून जाहिरात डाऊनलोड करा व ऑनलाईन पद्धतीने खालील लिंक वरून अर्ज सादर करा.
मूळ जाहिरात : डाउनलोड करा
ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा