Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 : महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभाग मध्ये विविध पदे भरण्यासाठी 05 ऑक्टोबर 2024 रोजी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
त्यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने विहित तारखेच्या आत अर्ज सादर करायचे आहेत आदिवासी विकास विभागाचा सुधारित आकृतिबंध मंजूर झालेला आहे.
त्या विभाग कार्यालयातील सरळसेवेच्या रिक्त पदे 100% भरायची आहेत, या अंतर्गत वर्ग तीन संवर्गातील वेगवेगळी पदे भरायचे आहेत.
आदिवासी विकास विभागाच्या या पदाभरती मध्ये वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, सहायक लेखापाल, ,गृहपाल, अधीक्षक प्रयोगशाळा तंत्रज्ञा, कॅमेरामन पद भरतीसाठी 12 ऑक्टोबर 2024 पासून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येणार आहेत.
इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत, आदिवासी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरू शकणार आहात, पदभरती मधील विविध पदांच्या सविस्तर माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वरून जाहिरात डाऊनलोड करून वाचू शकता आणि त्या पद्धतीने अर्ज सादर करू शकता.
पदा नुसार वेगवेगळा पगार दर्शवण्यात आलेला असून इच्छुक उमेदवाराने अर्ज सादर करण्या अगोदर सविस्तर जाहिरात वाचावी आणि त्यानंतर पात्र असलेल्या पदासाठी अर्ज सादर करावा या पदभरती संदर्भातील कार्यक्रम त्याच्यातली बदल, सूचना ह्या अधिकृत संकेतस्थळावरच प्रकाशित करण्यात येणार आहेत.
उमेदवाराशी या संदर्भात कोणताही पत्र व्यवहार करण्यात येणार नसून नोटीस आदिवासी विकास संकेतस्थळावरून सविस्तर पाहू शकता, पदसंख्या त्याच्या आरक्षणासंदर्भातील माहिती जाहिरात मध्ये दिलेली आहे.
यासोबतच सर्वसाधारण तरतुदी अटी व शर्ती सुद्धा जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या आहेत उमेदवार राखीव संवर्गातून अर्ज करत असेल तर उमेदवाराला जातीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
सर्व पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता जाहिराती माझ्या नमूद केलेली आहे इच्छुक उमेदवाराने संपूर्ण जाहिरात वाचून त्यामध्ये आवश्यक ते शिक्षण धारण करत असल्यास पदासाठी अर्ज करावा, जर उमेदवार पात्रता धारण करत नसेल तर त्यांनी अर्ज सादर करू नये असे अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत.
उमेदवाराची निवड संगणक प्रणालीवरील परीक्षा द्वारे घेतल्या जाणार आहे बहुपर्यायी प्रश्नाद्वारे ही परीक्षा घेतली जाणार आहे व त्यानंतर सर्वाधिक गुण असलेल्या उमेदवारांचे याठिकाणी निवड केल्या जाणार आहे याविषयीचे सुद्धा संपूर्ण माहिती जाहिरात मध्ये आहे.
त्यासोबतच ऑनलाइन अर्ज कसा करावा, ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी कोण कोणती कागदपत्रे सोबत ठेवावी याची माहिती सुद्धा जाहिरातीत दिलेली आहे,अर्ज करताना हस्तलिखित घोषणापत्र उमेदवाराला सादर करायचे असून घोषणापत्र जाहिरातीमधील पान क्रमांक ३९ वर दिलेले आहे.
या पदभरतीसाठी उमेदवाराला अर्जाचे शुल्क ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत या पदभरती साठी इच्छुक असाल असेल तर आत्ताच खाली लिंक वर जाऊन जाहिरात डाउनलोड करा आत्ताच अप्लाय करा.
मूळ जाहिरात : डाउनलोड करा
ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा